SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

कोल्हापुरात खड्डे बुजविण्यासाठी ‘इन्स्टा रोड पॅचर’चा प्रयोग

schedule31 Aug 26 person by visibility 262 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांवरील खड्डे जलद आणि टिकाऊ पद्धतीने बुजविण्यासाठी महापालिकेकडून आधुनिक ‘इन्स्टा रोड पॅचर’ तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात येत आहे. GIPSAT डांबर तंत्रज्ञानावर आधारित या यंत्राचे प्रात्यक्षिक आज पापाची तिकटी-पान लाईन मुख्य रस्त्यावर घेण्यात आले. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी यावेळी प्रत्यक्ष या प्रात्यक्षिकाची पाहणी केली.

तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर व स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनीही भेट देऊन या प्रात्यक्षिकाची पाहणी केली.

‘इन्स्टा रोड पॅचर’मध्ये दाब-संवेदनशील (Pressure Sensitive) साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे काही मिनिटांत बुजविणे शक्य होते. विशेष म्हणजे या पद्धतीसाठी ट्रक, डंपर किंवा मोठ्या रोलर यांसारख्या अवजड यंत्रसामग्रीची आवश्यकता नसल्याने कमी मनुष्यबळात रस्ते दुरुस्तीचे काम करता येते.

या तंत्रज्ञानामध्ये डांबर, खडी आणि विशेष रसायनांचे तयार मिश्रण वापरले जाते. हे मिश्रण गरम करण्याची आवश्यकता नसून सर्व ऋतू आणि विविध हवामान परिस्थितीत वापरता येते. दुरुस्ती झाल्यानंतर रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करता येत असल्याने रस्ता थंड होण्याची प्रतीक्षा करावी लागत नाही.

एका खड्ड्याच्या पॅचवर्कसाठी सुमारे दहा मिनिटांचा कालावधी लागतो. दुरुस्ती किमान दोन वर्षे टिकण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये असल्याने वारंवार होणाऱ्या रस्ते दुरुस्तीचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. लहान रस्ते तसेच तातडीच्या खड्डे दुरुस्तीसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

पारंपरिक पद्धतीने खड्डे बुजविताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, वेळ आणि यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. तसेच दुरुस्ती केल्यानंतर काही काळात पुन्हा खड्डे पडण्याची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर IRP-GIPSAT तंत्रज्ञान रस्ते दुरुस्तीच्या कामात अधिक जलद आणि कार्यक्षम पर्याय ठरू शकतो. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान म्हणूनही त्याचा वापर करण्याचा दावा करण्यात आला आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या लक्षात घेता, या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महापालिकेसाठी कितपत फायदेशीर ठरतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

या प्रात्यक्षिकावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, इन्स्टा रोड पॅचर कपंनीचे जिपसॅट व्यवस्थापक आदर्श खोब्रागडे, उप प्रकल्प अभियंता आशिष घाटोळ, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुणकुमार गवळी, निवास पोवार, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes