SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवडघरफाळा 6 टक्के सवलत योजने अंतर्गत एक दिवसांत 1 कोटी 1 लाख रुपये जमाशिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ : डॉ. संजय डी. पाटील यांची ग्वाही; आघाडीच्यावतीने कुलगुरु, प्र-कुलगुरूंचे स्वागत​"शासकीय कंत्राटदारांच्या प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी १४ जून रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय महाअधिवेशन"काळाचा ठेवा: 'आंतरराष्ट्रीय अभिलेख दिवस' आणि आपल्या वारशाचे जतनमराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मेघराज राजेभोसले यांच्या 'समर्थ पॅनेल'चा दणदणीत विजयकोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाजागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती व दंडात्मक मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसादसायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रमआयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी विविध विभागांचा घेतला आढावा

जाहिरात

 

घरफाळा 6 टक्के सवलत योजने अंतर्गत एक दिवसांत 1 कोटी 1 लाख रुपये जमा

schedule09 Jun 26 person by visibility 75 categoryआरोग्य

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि. 01 एप्रिल ते  30 जून 2026 अखेर सन 2026-27 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम भरणा केल्यास महापालिका करामध्ये 6 टक्के सूट जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार दि.9 जून 2026 रोजी एकूण 2,380 मिळकतधारकांनी 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घेवून 1 कोटी 1 लाख 580 रुपये इतकी रक्कम जमा करुन सवलत योजनेचा लाभ घेतलेला आहे. 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ज्या मिळकतधारकांनी अद्यापही घरफाळा भरणा केला नसेल त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी 9:00 ते दुपारी 4:30 या कालावधीमध्ये आपला घरफाळा भरावा. तसेच, नागरीकांच्या सोईसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम व महानगरपालिका संकेत स्थळावरुन सुध्दा ऑनलाईन रक्कम भरणा करणेची सुविधा उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. त्याचप्रमाणे घरफाळा विभागीय कार्यालयामधील व नागरी सुविधा केंद्र मधील किओस्क मशिनव्दारे ऑनलाईन रक्कम भरणा करणेची सुविधा देखिल उपलब्ध करुन देणेत आलेली आहे.

तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी दि.30 जून 2026 अखेर आपली सन 2026-27 चालू आर्थिक वर्षाची घरफाळ्याची रक्कम भरुन 6 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes