SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्राच्या मागणीला यश : मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा: वस्तू व सेवाकरातून सूट : मंत्री आदिती तटकरे यांची माहितीकॅन्सर उपचारातील प्रगत जनुक सुधारित सेल थेरपी जीएसटीच्या कक्षेबाहेर; रुग्णांना दिलासा मिळणार मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापनाडी वाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची ‘एमएएस’कडून यंग असोसिएट व फेलो म्हणून निवडइंडिया आघाडीच्या वतीने उद्या रविवारी बिंदू चौक येथे केंद्रीय गृहमंत्र्यांचा निषेध‘आविष्कार’मध्ये पदव्युत्तर संशोधकांकडून १९१ प्रकल्पांचे सादरीकरण; पदवीस्तरीय आणि पीएचडी संशोधन स्तरीय सादरीकरण स्पर्धेचा गटनिहाय निकालनाम. मुश्रीफ, नाम.आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट; डोंगळे कुटुंबियांकडून दोन्ही मंत्र्यांचा सत्कारनूतन मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांचे विमानतळावर स्वागतकरवीर नगरीमध्ये कॅबिनेट मंत्री मुश्रीफ, आबिटकर यांचे जोरदार स्वागतबीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

‘आविष्कार’मध्ये पदव्युत्तर संशोधकांकडून १९१ प्रकल्पांचे सादरीकरण; पदवीस्तरीय आणि पीएचडी संशोधन स्तरीय सादरीकरण स्पर्धेचा गटनिहाय निकाल

schedule21 Dec 24 person by visibility 90 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या दोनदिवसीय विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये आज दुसऱ्या दिवशी पदव्युत्तर स्तरीय संशोधक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपल्या संशोधन प्रकल्पांचे पोस्टर तसेच मॉडेल्सद्वारे सादरीकरण केले. आज एकूण १९१ संशोधकांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला. आजच्या महोत्सवामध्ये देखील संशोधकांमधील सामाजिक जाणिवांचे दर्शन त्यांनी संशोधनासाठी निवडलेल्या विषयांमधून घडत होते. दरम्यान, काल झालेल्या स्पर्धेचा निकालही सायंकाळी जाहीर करण्यात आला. त्यामधील अनुक्रमे पहिल्या तीन विजेत्या प्रकल्पांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे.

शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचे उद्दीष्ट बाळगून दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करण्यात येतो. जिल्हास्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेच्या फेऱ्यांनंतर विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पार पडला. रसायनशास्त्र अधिविभागातर्फे महोत्सवाचे संयोजन करण्यात आले.

संशोधकांनी मानव्यशास्त्र, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, शुद्ध विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय आणि औषधनिर्माण या सहा श्रेणींमध्ये प्रकल्प सादरीकरण केले. यामध्ये मानव्यशास्त्र गटात १७, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा गटात १९, शुद्ध विज्ञान गटात ५६, कृषी आणि पशुसंवर्धन गटात ३८, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान गटात १८ आणि वैद्यकीय व औषधनिर्माण गटात ४४ इतक्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यात विविध वनस्पतींच्या विविध घटकांपासून वेगवेगळ्या प्रकारची औषधे निर्माण करण्यापासून ते वेगवेगळी जैविक पद्धतीने नाश होणारी साधने व वस्तू यांची निर्मिती, जैविक खतनिर्मितीचे नवे पर्याय, उपयुक्त रंगनिर्मिती, सुपर कपॅसिटर निर्मिती, अन्नधान्य निरीक्षण पद्धती इत्यादींपासून ते युवकांमधील आत्महत्यांविषयी शोध, सायबर हल्ल्यांचा व्यापक दुष्परिणाम, भाषिक व्यवहार बदलांवरील समाजमाध्यमांचा प्रभाव अशा अनेक विषयांवरील प्रकल्प मांडण्यात आले. ही सादरीकरणे पाहण्यासाठी केवळ महाविद्यालयीनच नव्हे, तर शालेय विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली होती.

▪️दरम्यान, महोत्सवात काल झालेल्या पदवीस्तरीय आणि पीएचडी संशोधन स्तरीय सादरीकरण स्पर्धेचा निकाल गटनिहाय अनुक्रमे पुढीलप्रमाणे:-

▪️पदवीस्तरीय स्पर्धा: मानव्यशास्त्र, भाषा आणि कला:- १. भिसे प्रिती राजू (डी.के.ए.ए. महाविद्यालय, इचलकरंजी,) २. माने श्रुती सुरेश (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर), ३. पाटील अवंती अरविंद (जयसिंगपूर महाविद्यालय, जयसिंगपूर), ४. मुजावर सानिया जफर (विलिंग्डन महाविद्यालय, सांगली), ५. महाजन इंद्रायणी जालंदर (श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली).

▪️वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा:- १. पिसाळ शर्वरी शैलेंद्र (केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, सातारा) २. गुरव शर्वरी भास्कर (न्यू कॉलेज, कोल्हापूर) ३. सूर्यवंशी सानिया धनाजी (यशवंतराव चव्हाण आर्ट्स कॉलेज, उरूण इस्लामपूर), ४. सावंत रामकृष्ण विवेक (तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, वारणानगर), ५. गायकवाड रसिका राजेंद्र (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर).

▪️शुद्ध विज्ञान:- १. श्रीनिवास संचिता अजयकुमार (केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर), २. भुजबळ प्रतिक्षा हरीभाऊ (मुधोजी कॉलेज, फलटण), ३. बोरनाईक अनुराधा संजय (देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर),४. काळे नुपूर आनंदा (विलिंग्डन कॉलेज, सांगली), ५. शिंदे साक्षी सुनिल (दादासाहेब ज्योतीराम गोडसे महाविद्यालय, पलूस).

▪️कृषी आणि पशुसंवर्धन:- १. पाटील विघ्नेश उत्तम (न्यू कॉलेज, कोल्हापूर), २. मुल्ला ताहीर निसार (यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, कराड) ३.कोंडुसकर रितिका रविंद्र (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर) ४. पानसरे जान्हवी यू. (राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, साखराळे),  ५. पाटील यश उमेश (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगांव)

▪️अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान:- १. घोईसावरवाडे दीक्षा निवास (न्यू कॉलेज, कोल्हापूर), २. लोकरे प्राची आनंदराव (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव), ३. पाटील श्रुती सुहास (कॉलेज ऑफ नॉन-कॉनव्हेशनल व्होकेशनल ऑफ कोर्स फॉर विमेन, कोल्हापूर), ४. पाटील निखिल निशिकांत (संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, चिंचेवाडी, गडहिंग्लज), ५. घाडगे पद्मावती प्रमोद (आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, सांगली).                       

▪️वैद्यकीय आणि औषधनिर्माण:- १. किल्लेदार श्रुती प्रशांत (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), २. सावंत वैष्णवी राजेंद्र (सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड), ३. पाटील ऋषीकेश सुनिल (अरविंद गवळी कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा), ४. माने स्वप्नील संपत (वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोडोली), ५. गडकरी अफताब मेहबूब (राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर).

▪️पीएचडी संशोधनस्तरीय स्पर्धा: मानव्यशास्त्र, भाषा आणि कला:- १. कांबळे निलम बाळकृष्ण (डी.पी. भोसले कॉलेज, कोरेगाव), २. चौगुले किरण माणिकराव (यशवंतराव चव्हाण कॉलेज, उरूण इस्लामपूर), ३. बुद्धनवार सुनिल श्रीशैल्य (बळवंत कॉलेज, विटा).

शुद्ध विज्ञान:- १. चौगुले ऋतुजा दत्तात्रय (भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), २.  माळी किरण कुमार (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड), ३. इनामदार फरिदा रफिक (कस्तुरबाई वालचंद कॉलेज, सांगली), ४. देशमुख पूजा मोहन (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड), ५. भोसले अनिकेत दत्तात्रय (लालबहादूर शास्त्री कॉलेज, सातारा).

▪️कृषी आणि पशुसंवर्धन:- १. वखारिया रोहन रजनीकांत (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव), २. मुरगुडे मनिषा माणिक (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव), ३. दहिवडे ललिता कमलाकर (भारती विदयापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), ४. डोंगरे प्रतीक्षा माणिक (जीवरसायनशास्त्र अधिविभाग, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर), ५. शिंदे सुनिता सखाराम (तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, वारणानगर).

▪️अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान:- १. चौगुले आण्णासाहेब महावीर (शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर), २. शीद शुभांगी (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव) ३. गिरीगोसावी शुभम तानाजी (भूगोल अधिविभाग, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर), ४. शेळके अभिजित श्रीमंत (लालबहादूर शास्त्री कॉलेज, सातारा)

▪️वैद्यकीय आणि औषधनिर्माण:- १. नेर्लेकर निशा अरुण (जैवरसायनशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), २. धरणगुत्तीकर व्यंकटेश रविंद्र (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव) ३. देसाई  नेहा दिपक ( अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, पेठ वडगाव), ४. कचरे क्रांती शहाजी (रसायनशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), ५. डांगे विद्या नामदेव (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव).

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes