SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिलांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचे लघुउद्योग सुरू करावेत : पूनमताई तोडकरबाल लैंगिक शोषण, अत्याचार आणि हिंसेपासून बचाव व उपचार जागतिक दिन: एक सामाजिक जबाबदारीपालकसचिव जिल्ह्यांमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देशगोकुळ दूध संघाच्या नूतन संचालकांनी घेतली उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेटशिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसह विविध विकासकामांसाठी शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट!भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात कोल्हापूर : लीशा हॉटेल ते कदमवाडी रस्त्यावरील अनधिकृत पत्रा शेडवर महापालिकेची कारवाईआमदार यड्रावकर यांच्या हस्ते कवठेसार व कोथळीत ८८.२८ लाख रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात मंगळवारी 'कै. रामचंद्र कबनूरकर स्मृती' भव्य खुली एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धासंजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. रविंद्र धोंगडी यांना ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड’ने सन्मानित

जाहिरात

 

भाजपा जिल्हा कार्यालयात नूतन आमदार कौस्तुभ गावडे यांचा भव्य सत्कार

schedule29 Oct 26 person by visibility 427 categoryराजकीय

◼️पक्षासाठी २४ तास काम करणार; शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध – आमदार कौस्तुभ गावडे

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपा-महायुतीचे नूतन आमदार म्हणून निवडून आलेले कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागाळा पार्क येथील भाजपा जिल्हा कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना आमदार कौस्तुभ गावडे म्हणाले, “हा विजय माझा एकट्याचा नसून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. मी माझ्या विजयाचे संपूर्ण श्रेय पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना अर्पण करतो. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळे ही जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

“पक्षासाठी २४ तास काम करत राहणार असून, पक्षसंघटनेला अधिक ताकद देण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यापुढे ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम करणे गरजेचे आहे. हे केवळ एका व्यक्तीचे काम नसून आपल्या सर्वांचे सामूहिक दायित्व आहे. सर्वांनी कार्यकर्ता म्हणून खांद्याला खांदा लावून काम केले, तर संघटना अधिक मजबूत होईल. उद्यापासूनच कामाला सुरुवात करून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासह त्यांच्या न्याय्य मागण्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,” अशी ग्वाही आमदार गावडे यांनी दिली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नूतन आमदार कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नाथाजी पाटील यांनी हा विजय भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक ताकदीचा आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा विजय असल्याचे सांगितले.

भाजपा माजी प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे काम जमाने करत त्यांच्या समस्या,मागण्या समोरून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, राहुल चिकोडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, माजी प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, अमर साठे, डॉ आनंद गुरव, सुशीला पाटील, माधुरी नकाते, मेघराणी जाधव, विश्वजीत पवार 
यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उपस्थितांनी नूतन आमदारांचे अभिनंदन करून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आणि पक्षसंघटनेच्या बळकटीकरणासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes