बाल कामगार प्रथेविरोधी सप्ताहाचे 14 ते 20 नोव्हेंबर कालावधीत आयोजन
schedule12 Nov 25 person by visibility 3 categoryराज्य
कोल्हापूर : 14 नोव्हेंबर बाल दिन या दिवसाचे औचित्य साधत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत 14 ते 20 नोव्हेंबर कालावधीत बाल कामगार प्रथेविरोधी सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.
या सप्ताहामध्ये प्रामुख्याने स्वाक्षरी मोहीम अभियान, दुकाने व आस्थापनांच्या ठिकाणी दर्शनी भागात बालकामगार कामावर न ठेवण्याबाबतचे स्टिकर्स लावणे, कृती दलामार्फत धाडसत्रांचे आयोजन करुन विटभट्टी, खडीक्रशर, हॉटेल, दुकाने, चहा टपरी, गॅरेज इ. ठिकाणी तपासणी करुन बालमजुरांची मुक्तता करणे, हॉटेल असोसिएशन, दुकाने व व्यापारी असोसिएशन, औद्योगिक क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि कामगार संघटना यांच्या बैठका घेवून सुधारित बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन), 1986 मधील तदतुदींची माहिती देणे,
या बैठकांमध्ये बाल कामगार कामावर न ठेवण्याबाबत सामुदायिक शपथ घेणे व हमीपत्र घेणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.