SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

सोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!

schedule14 Aug 26 person by visibility 406 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे बालिंगा सब स्टेशन च्या 33 केव्ही मुख्य विज वाहिनीचे देखभाल दुरूस्तीचे कामकाज महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीमार्फत सोमवारी हाती घेण्यात येणार आहे. सोमवार, दि.17 ऑगस्ट 2026 रोजी विद्युत पुरवठा बंद रहाणार असलेने दैनंदिन पाणी उपसा या पंपिग स्टेशनवरुन होऊ शकणार नाही. त्यामुळे या दिवशी पाणी पुरवठा बंद राहिल व मंगळवार, दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी होणार पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.

  यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजीपेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग, सी डी वॉर्ड अंतर्गत दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वरपेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवारपेठ तालिम, सिध्दार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदुचौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदीर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवलक्लब. ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोलपंप, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी परिसरात सोमवारी दैनंदिन होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

 तरी संबधीत भागातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून व अपव्यय टाळून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes