SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर-९ बास्केटबॉल स्पर्धेचा दिमाखात प्रारंभ

schedule22 Aug 26 person by visibility 389 categoryक्रीडा

कोल्हापूर : सीबीएसई बोर्ड नवी दिल्ली मार्फत आयोजित सीबीएसई क्लस्टर-९ बास्केटबॉल चॅम्पियनशिप २०२६-२७ स्पर्धेचा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूरच्या  मैदानावर उत्साहात प्रारंभ झाला. सदर स्पर्धा २१ ते २५ ऑगस्ट २०२६ दरम्यान खेळल्या जाणार आहेत . महाराष्ट्र व गोवा राज्यांतील तब्बल ४४ शाळांमधील १००० हून अधिक विद्यार्थी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 14, 17 व 19 या वयोगटातील मुले व मुली या पद्धतीने या स्पर्धा पार पडतील. 

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू सक्लैन सय्यद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, सीबीएसई निरीक्षक पूर्ण श्रेष्ठ, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिक-प्राचार्या सस्मिता मोहंती आणि शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. महिंद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचे यावेळी स्वागत व सत्कार करण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना क्रीडाभावना, शिस्त, संघभावना, सातत्य आणि चिकाटी यांचे महत्त्व अधोरेखित केले. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलकडून नवोदित खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा व व्यासपीठ उपलब्ध करून देत क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याबद्दल मान्यवरांनी संस्थेचे कौतुक केले.

सोहळ्यात सहभागी संघांच्या दिमाखदार संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर खेळाडूंचा शपथविधी आणि संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरणात उत्साह व चैतन्य निर्माण केले. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर पुढील पाच दिवसांच्या रोमांचक सामन्यांना सुरुवात झाली. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉ एच.एम नवीन, डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य अस्कर अली, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर, सर्व क्रीडा शिक्षक, शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी हे अनमोल योगदान देत आहेत.

या स्पर्धेत देशाच्या भविष्यातील बास्केटबॉलपटूंचे कौशल्य, जिद्द, शिस्त आणि खिलाडूवृत्ती अनुभवायला मिळणार असून, क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडूंना घडविणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes