SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी

schedule16 Jun 26 person by visibility 461 categoryराज्य

कोल्हापूर: कोल्हापूरच्या एमआयडीसी परिसरातील कंपन्यांना लक्ष्य करून कार्हाईड इन्सर्ट आणि इतर मौल्यवान साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २५ लाख ३६ हजार ७२३ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दिनांक ५ ते ६ जून २०२६ दरम्यान शिरोली एमआयडीसीमधील 'स्काय टेक्नोव्हिजन' आणि 'एस.व्ही. इंजिनिअरिंग सोल्युशन' या कंपन्यांच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कार्हाईड इन्सर्ट, टुल्स आणि डीव्हीआर चोरून नेले होते. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चोरीचा माल एका मालवाहू वाहनातून नेत असताना त्यांना किणी, ता. हातकणंगले येथे सापळा रचून पकडण्यात आले.

विजय विलास गोसावी आणि राहुल शिवाजी गोसावी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी आपल्या साथीदारांसह गुन्ह्यांची कबुली दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या टोळीच्या अटकेमुळे एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes