SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद

schedule16 May 26 person by visibility 314 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा 2025-26 मध्ये दमदार 109 गुणांची कमाई करत फिजिओथेरपी कॉलेज संघाने सलग दुसऱ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 

विजेत्या संघांना डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या हस्ते चषक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. फिजिओथेरपी कॉलेजची श्रावणी अशोक जंगटे आणि स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचा सोहम राजेश शिंदे यांना ‘उत्कृष्ट खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, “क्रीडा स्पर्धा म्हणजे केवळ जय-पराजय नव्हे, तर नेतृत्व, शिस्त आणि संघभावना शिकवणारे प्रभावी व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी खेळातून आत्मविश्वास, तंदुरुस्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करावा. पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून स्पर्धेला नव्या उंचीवर न्यावे.

कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी सांगितले, “विद्यापीठाच्या आठ संस्थांमधील तब्बल 870 खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक अशा 10 विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला. शिक्षणाबरोबरच खेळ, एनएसएस, एनसीसी आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो. खेळ विद्यार्थ्यांमध्ये निर्णयक्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करतात.

या स्पर्धेदरम्यान विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व संघांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जगमे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. ग्रंथेज ओतारी, डॉ. मनीषा विजापूरकर, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व क्रीडा विभागप्रमुख उपस्थित होते. शंकर गोनुगडे यांनी आभार मानले.

विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सतेज पाटील आणि विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी विजेत्या संघांसह सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes