SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'एक्सलंट' श्रेणी

schedule06 Jul 26 person by visibility 346 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर  इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून (एम. एस. बी. टी. ई.) एक्सलंट श्रेणी प्राप्त झाली आहे.
मेकॅनिकल आणि सिव्हिल या शाखांना  'व्हेरी गुड' ही श्रेणी प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये झालेल्या अकॅडमीक मॉनिटरिंगनुसार ही श्रेणी मिळाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी दिली.

गेल्या वर्षभरातील शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांचे परीक्षांमधील निकाल, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम, उद्योग क्षेत्राबरोबर केलेले सामंजस्य करार आणि शिक्षकांसाठी राबविलेले प्रोत्साहनपर व संशोधनात्मक कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मिळालेले पेटंट आदी बाबींची तपासणी एम.एस. बी. टी. ई. तज्ज्ञांच्या समितीकडून केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार पॉलिटेक्निकला ही श्रेणी मिळाली आहे. 'हिरकणी मंच' च्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी राबविलेले वैविध्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही दखल घेण्यात आली. 

या बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए . के.गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम  यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन  केले.

यासाठी प्राचार्य डॉ.महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके , विभाग प्रमुख डॉ.पी.के.शिंदे,प्रा.एस.बी.शिंदे, प्रा.अक्षय करपे, प्रा.शीतल साळोखे  तसेच सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes