SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजली

schedule04 Aug 26 person by visibility 526 categoryराज्य

शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. सात विद्यापीठांच्या माध्यमातून ज्यांनी लाखो विद्यार्थ्यांचे करिअर घडवले, खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रचार प्रसार केला, असे डॉक्टर डी वाय पाटील माझ्यासाठी आदरणीय आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व होते. आरोग्य क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले.  आमदार म्हणूनही त्यांनी काही काळ राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. तर तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी तत्त्वनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ काम पाहिले.  महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जीवनातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे नाव अजरामर राहील. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाच्या निधनामुळे फक्त कोल्हापूरचे नव्हे तर महाराष्ट्राचे अतिव नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे.

----------------------------------

◼️शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील युगपुरुष हरपले!
​पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावूक प्रतिक्रिया

डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डॉ. डी. वाय. पाटील) यांच्या दुःखद निधनाने शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण क्षेत्रातील एक युगपुरुष हरपला आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रासह देशभरात अनेक शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांची उभारणी करून ज्ञान, शिक्षण आणि आरोग्यसेवेची दारे लाखो विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी खुली केली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार आणि समाजसेवेच्या संधी उपलब्ध झाल्या.

शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या प्रतिष्ठित नागरी सन्मानाने गौरविले. अभ्यासू, दूरदर्शी, कर्तृत्ववान आणि समाजहिताची अखंड जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात अमूल्य योगदान दिले. त्यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील कुटुंबीयांना तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांती!

-----‐------------'-------'------------------

◼️डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला शोक

मुंबई : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यमंत्री तथा कोल्हापूरच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून त्यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांची उभारणी करून असंख्य विद्यार्थ्यांना ज्ञान, शिक्षण व प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर कायम राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक महान शिक्षणमहर्षी, दूरदृष्टीचे समाजसेवक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांची समाजाप्रती असलेली निष्ठा, कार्यतत्परता आणि लोककल्याणाची भावना भावी पिढ्यांना सदैव मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी म्हटले आहे.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, राज्यमंत्री मिसाळ यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या व आप्तेष्टांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे. परमेश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes