SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जीवनात येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा : संग्राम पाटील; डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण गडहिंग्लज-आजरा 'बायपास'साठी धनंजय महाडिक संसदेत कडाडले; वाढत्या अपघातांकडे वेधले लक्ष!‘गोकुळ’ मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतराव चव्‍हाण यांना अभिवादन ...परिवहन समितीचे नूतन सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर; केएमटी स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेसुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना (उबाठा) आक्रमक; आजपासून महापालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषण!आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणकोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवड

जाहिरात

 

परिवहन समितीचे नूतन सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर; केएमटी स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे

schedule12 Mar 26 person by visibility 171 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत परिवहन विभागाचा सविस्तर आढावा घेतला. परिवहन विभागाला उर्जितावस्था देत केएमटीला स्वयंपूर्ण व नफ्यात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सभापतीपदी निवड झाल्यानंतर जाधव यांनी आज परिवहन कार्यालयास भेट देत विभागातील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, ट्रॅफिक अधिकारी नितीन पोवार, लेखा अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी, खरेदी अधिकारी संजय जाधव, आस्थापन व्यवस्थापक बानू साबळे, वर्कशॉप इन्चार्ज आर. आर. मोरे, प्रदीप मेहत्तर, दिनेश सोमण, संतोष लोखंडे आदी अधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली व परिवहन विभागाची माहिती घेतली.

यावेळी सत्यजित जाधव म्हणाले, केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या १०० एसी बसांसाठी पाठपुरावा करण्यात येणार असून केएमटीचा ताफा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बसांनी सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बससेवा वापरावी यासाठी बसस्थानके स्वच्छ ठेवणे, सेवा दर्जेदार करणे आणि केएमटीचा कारभार सक्षम करणे यावर भर देण्यात येणार आहे. तसेच ठोक मानधनावर काम करणाऱ्या केएमटी कामगारांच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देऊन त्यांच्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
चालक व वाहकांचा विमा उतरविण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नूतन सभापती जाधव यांनी दिले.

हातकणंगले तसेच इचलकरंजी परिसरात केएमटी बससेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असून, केएमटी विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी अधिकाऱ्यांसोबत नियमित आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सत्यजित जाधव यांनी सांगितले.

यानंतर नूतन सभापती जाधव यांनी शास्त्रीनगर येथील केएमटी वर्कशॉपला भेट देऊन स्टोअर, ऑइल, असेंबली, डिझेल विभागासह विविध विभागांची पाहणी केली. वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. या वेळी वर्कशॉपचे सुपरवायझर जगदीश शेंडगे, मोरे तसेच केएमटी मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्या हस्ते नूतन सभापती सत्यजित जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेचा परिवहन विभाग सक्षम व स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहन सभापती सत्यजित जाधव यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes