SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

कासारी नदीच्या दोन्ही तीरावर उपसाबंदी

schedule03 Jun 26 person by visibility 191 categoryराज्य

कोल्हापूर : पाटबंधारे विभागाच्या अधिनियम 1976 नुसार  कासारी नदीच्या दोन्ही तीरावरील नमुद केलेल्या भागात पाटबंधारे विभाग उत्तरच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी रब्बी हंगाम 2026-27 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदी जाहीर केली आहे.  

कासारी धरण ते बाजारभोगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या नदीपात्रातील तसेच संबंधित ओढे-नाल्यांच्या दोन्ही तीरांवरील भागात 4 ते 5 जून  या कालावधीत दोन दिवसांची उपसाबंदी राहील. तसेच बाजारभोगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याखालून यवलूज येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या नदीपात्रातील तसेच संबंधित ओढे-नाल्यांच्या दोन्ही तीरांवरील भागात 6 ते 7 जून या कालावधीत दोन दिवसांची उपसाबंदी लागू राहील.

उपसाबंदीच्या कालावधीत शेतीसाठी अनधिकृतरीत्या पाणी उपसा करताना आढळल्यास संबंधित उपसा यंत्र जप्त करण्यात येईल. तसेच संबंधित परवानाधारकाचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही. आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 51 (3) व 97 अन्वये देण्यात आला असून शेतकऱ्यांनी त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes