SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिलांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचे लघुउद्योग सुरू करावेत : पूनमताई तोडकरबाल लैंगिक शोषण, अत्याचार आणि हिंसेपासून बचाव व उपचार जागतिक दिन: एक सामाजिक जबाबदारीपालकसचिव जिल्ह्यांमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देशगोकुळ दूध संघाच्या नूतन संचालकांनी घेतली उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेटशिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसह विविध विकासकामांसाठी शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट!भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात कोल्हापूर : लीशा हॉटेल ते कदमवाडी रस्त्यावरील अनधिकृत पत्रा शेडवर महापालिकेची कारवाईआमदार यड्रावकर यांच्या हस्ते कवठेसार व कोथळीत ८८.२८ लाख रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात मंगळवारी 'कै. रामचंद्र कबनूरकर स्मृती' भव्य खुली एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धासंजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. रविंद्र धोंगडी यांना ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड’ने सन्मानित

जाहिरात

 

गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा

schedule02 Nov 26 person by visibility 321 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) यांच्या वतीने यावर्षीही ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, गोकुळ संलग्न सर्व दूध उत्पादकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी केले आहे.

    दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे व उत्पादकांचा सन्मान करणे हा उद्देश ठेवून गोकुळ दूध संघ दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हैशींसाठी ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करतो. यावर्षीची ‘गोकुळ श्री’ स्पर्धा दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कोणत्याही दिवशी घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर चेअरमन/सचिव यांच्या सही आणि शिक्क्यानिशी अर्ज करून दि. १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत संघाच्या बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात नोंदणी करावी. सहभागी होणाऱ्या दूध उत्पादकांच्या म्हैशीने किमान १२ लिटर व गायीने किमान २० लिटर प्रतिदिन दूध देणे आवश्यक आहे.

  या स्पर्धेतील विजेत्यांना म्हैस १ ते ३ क्रमांक व गाय १ ते ३ क्रमांक अशा सहा क्रमांकांना बक्षीस, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन ‘गोकुळ श्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

स्पर्धेबाबतच्या अटी व नियमांची सविस्तर माहिती प्राथमिक दूध संस्थांना स्वतंत्र परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे गोकुळ संघ दूध उत्पादकांना अधिक उत्पादनासाठी प्रेरित करीत असून, उत्पादकांचा सन्मान करण्याची परंपरा जपली जात आहे. जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांनी ‘गोकुळ श्री’ स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन गोकुळच्यावतीने करण्यात आले.

◼️बक्षिसाची रक्कम पुढीलप्रमाणे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes