SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापूर: बंद घराचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या; २.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

schedule06 Jul 26 person by visibility 239 categoryगुन्हे

कोल्हापूर : सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे घरात कोणी नसलेचे पाहून बंद घराचा कडी-कोयंडा उघडून चोरी करणाऱ्या चोरट्यास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अटक केली आहे. यश संतोष जाधव (वय २०, रा. सरनोबतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेली सोन्याची माळ आणि रोख रकमेसह एकूण २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २६ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत रेणुका मंदिर जवळ, सरनोबतवाडी येथील फिर्यादीच्या घराचा दरवाजा कडी-कोयंडा न लावता ओढून घेतलेला होता. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला आणि घरातील सोन्याची तीन पदरी माळ व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सूचना दिल्या होत्या. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, यश जाधव याला सरनोबतवाडी टोल नाक्याजवळ सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून ३२ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes