SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने रविवारी भव्य पुरस्कार वितरण सोहळा व शिक्षक मेळावा

schedule01 Sep 26 person by visibility 556 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श संस्था, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा व शिक्षक मेळावा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कोल्हापूर येथील लोटस हॉल, रेल्वे सिमेंट गुड्स शेजारी, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व गुणवतापूर्ण कार्य करणाऱ्या संस्था, शाळा, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या योगदानाला प्रोत्साहन देणे यांच्या कार्याचा गौरव करणे आणि समाजासमोर आदर्श शैक्षणिक कार्याची प्रेरणादायी उदाहरणे ठेवणे, या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्‌देश आहे.

या भव्य सोहळ्यास  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री  प्रकाश आबिटकर तसेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष  राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील  माने, राज्यसभा खासदार धनंजय  महाडिक तसेच उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख व पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे , संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  व मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ  है शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचान्यांच्या विविध प्रश्नांना शासन दरबारी मांडून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शिक्षकाच्या कार्याचा गौरव करणारा आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्राला प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. राज्यभरातील पुरस्कारार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्‌या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शिक्षण क्षेरातील उल्लेखनीय कार्याचा गौरव आणि शिक्षकांच्या सन्मानाचा हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मोठ्‌या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ  यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes