उद्यमनगरात वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल आयोजित आरोग्य पंधरवडा शिबीरास प्रारंभ
schedule09 Dec 24 person by visibility 180 categoryआरोग्य
कोल्हापूर : 'शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्यावतीने वैद्यकीय पथकाच्या समावेत भव्य आरोग्य सप्ताह आरोग्य पंधरवडा शिबिराचाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. ९ ते २३ डिसेंबर पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे 'त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉ. अमित बुरांडे यांनी केले . त्यांच्यासह माजी नगरसेवक क्रिकेट प्रेमी काका पाटील , शाहू मिल हाउसिंग सोसायटीचे राजेंद्र गायकवाड औद्योगिक वसाहतीचे फिरोज मुजावर, माहिती महासंघाचे जयराज कोळी , महेश जोशी , अवधूत चिकोडी , सुरेश माने आदी मान्यवरांच्या उपस्थित या शिबिराचा प्रारंभ झाला .
प्रारंभी पाहुण्याच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि संस्थापक शा . कृ . पंत वालावलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले .
प्रारंभी सर्वांचे स्वागत संतोष कुलकर्णी ,डॉ विरेंद्र वणकुद्रे आणि राजेंद्र मकोटे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले .
या शिबिरामध्ये प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ अमित बुरांडे हे मणका विकाराची, डायबेटीस फूट व चारकोट फूट ग्रस्त पेशंटची मोफत तपासणी करणार असून पुढील उपचार माफक दरात करणार आहेत, गुढघे व खुब्यांची सुद्धा तपासणी होणार आहे. गुढघा व खुबा बदलाची शस्त्रक्रिया फक्त नव्वद हजारात करणार आहोत तसेच डोळे तपासुन मोतीबिंदु चे ऑपरेशन लागल्यास फक्त चार हजार रुपयात करण्यात येणार आहे, दंत तपासणी होणार आहे, डेंटल इम्प्लांट्स ज्या पेशंटना लागणार आहेत त्यांना माफक दरात ऑपरेशन होणार आहे.
स्व शा कृ पंत वालावलकर यांनी गोर गरीब रुग्णांची सेवा व्हावी यासाठी या धर्मादाय हॉस्पिटल ची स्थापना केली होती. हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक डिजिटल एक्स रे ची सोय फक्त दोनशे पन्नास रुपयात उपलब्ध आहे. माफक दरात पॅथॉलॉजी विभाग सुरु आहे. ७ बेड चा आय सी यु व्हेंटिलेटर सह कार्यरत आहे. सुसज्ज्य दोन ऑपरेशन थियेटर आहेत. शिबीराती ल तपासणीनंतर लागणाऱ्या उपचारासाठी आणि विविध टेस्ट साठी भरीव सवलत ही दिली जाणार आहे तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत करताना केले . त्यांच्या मार्गदर्शना खाली डॉ . वीरेंद्र वणकुद्रे, दंतरोग तज्ञ डॉ नेहा चव्हाण, डॉ. ऋतुजा जंगम, मनीषा रोटे सह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियोजन करत आहेत .