SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाहीभाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट, महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणूनप्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट ​"६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा अन् नवी झेप! गोकुळच्या वर्धापन दिनानिमित्त 'गोकुळ आईस्क्रीम' लाँच आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन"'पालकत्वाचा लढा होईल सोपा; पद्माराजे हायस्कूलचा मदतीचा हात!'स्वच्छ कोल्हापूरसाठी महापालिका सरसावली; सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात राबवली धडक स्वच्छता मोहीम!वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनवरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त; शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, सिलिंडरचा साठा जप्त!धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजेव्हा भारतीय पडदा पहिल्यांदा बोलू लागला...

जाहिरात

 

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

schedule06 Feb 26 person by visibility 377 categoryराज्य

मुंबई  : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील”, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. त्याचबरोबर, प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे आहे.

दैनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे, अशा तक्रारी असतात. यासाठी आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी.

प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल आहे. वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी आहे. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. वक्तशीरपणा हीच एसटीची ओळख ठरली पाहिजे, यादृष्टीने एसटी प्रशासनाने सज्ज होण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी, हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes