SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

schedule27 May 26 person by visibility 251 categoryक्रीडा

कोल्हापूर : एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर यांच्या वतीने व एनसीसी डारेक्टरेट महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा (IGSSC)- 2026 चे आयोजन दिनांक 27 ते 29 मे 2026 या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, कोल्हापूर येथील शूटिंग रेंजवर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध एनसीसी ग्रुप मुख्यालयांतील गुणवंत एनसीसी कॅडेट नेमबाज या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

स्पर्धेच्या 27 मे रोजी महाराष्ट्रातील सर्व एनसीसी ग्रुप मुख्यालयांच्या संघातील प्रत्येकी 5 मुले एनसीसी कॅडेट (फायरर्स) यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक कॅडेटने 0.22 स्पोर्ट्स शूटिंग रायफलमधून 46 राऊंड्स फायर करून आपले नेमबाजी कौशल्य, शिस्त व एकाग्रतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. एनसीसी कॅडेट्समध्ये नेमबाजी क्रीडेला चालना देणे तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षम नेमबाज घडविणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. 

गुरुवार, दिनांक 28 मे 2026 रोजी प्रत्येक ग्रुप मुख्यालयाच्या संघातील 5 मुली एनसीसी कॅडेट (फायरर्स) या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तर, स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 29 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आला असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्स व विजेत्या संघाचा गौरव करण्यात येणार आहे. ही स्पर्धा एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर ब्रिगेडियर आर.के. पैठणकर ग्रुप कमांडर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एनसीसी अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये आणि क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील यांच्या समन्वयाने यशस्वीपणे पार पडत आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील एनसीसी कॅडेट्समध्ये शिस्त, क्रीडा भावना व नेमबाजीतील प्राविण्य वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes