SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

महापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजी

schedule04 Aug 26 person by visibility 307 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर  रूपाराणी निकम या शहरातील नागरिकांच्या महापालिकेतील विविध कामकाजाबाबत येणाऱ्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला "जनता दरबार" आयोजित करतात.

मात्र, ऑगस्ट २०२६ महिन्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचा दौरा तसेच शहरातील मतदार पुनर्निरीक्षण व नोंदणीच्या कामाचे नियोजन सुरू असल्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी या कामकाजात व्यस्त आहेत.

त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी होणारा "जनता दरबार" पुढे ढकलण्यात आला असून तो आता दि. ११ ऑगस्ट २०२६, मंगळवार रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी व आपल्या समस्या, तक्रारी व सूचना घेऊन दि.११ ऑगस्ट 2026 रोजी आयोजित "जनता दरबार"मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes