SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम यांच्या ऋषिकेश दौऱ्यामुळे ५ जूनचा जनता दरबार ११ जून रोजी होणार

schedule03 Jun 26 person by visibility 419 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स, नवी दिल्ली यांच्या वतीने उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ११७ व्या बैठकीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रुपाराणी निकम उपस्थित राहण्यासाठी रवाना झाल्या आहेत. 

देशातील विविध महानगरपालिकेच्या महापौर या बैठकीस उपस्थित राहणार असून स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी सुविधा, शहरी विकास, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच महानगर प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्सचे सचिव मनोज गुप्ता यांनी पाठविलेल्या निमंत्रणानुसार सदर बैठक दि.३ जून  रोजी ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख महानगरांतील महापौर सहभागी होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उत्तम उपक्रमांची देवाणघेवाण तसेच विविध विकासात्मक विषयांवर विचारमंथन करण्यात येणार आहे.

महापौर रुपाराणी निकम यांच्या या अधिकृत दौऱ्यामुळे दर महिन्याच्या ५ तारखेला आयोजित करण्यात येणारा जनता दरबार यावेळी नियोजित तारखेला होऊ शकणार नाही. त्यामुळे जून महिन्यातील जनता दरबार गुरुवार दिनांक ११ जून  रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

जनता दरबारामध्ये नागरिकांना त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना व विविध नागरी विषय थेट महापौरांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे सर्व नागरिकांनी जनता दरबाराची सुधारित तारीख लक्षात घेऊन दिनांक ११ जून  रोजी उपस्थित राहावे असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes