SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

कोल्हापुरात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन

schedule21 May 26 person by visibility 373 categoryराजकीय

कोल्हापूर: सध्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत बदल होत असतानाच, भारतात एकाच आठवड्यात दोनदा झालेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंपांवर  आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "मोदी सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

 आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, "एकीकडे देशात प्रचंड बेरोजगारी आहे आणि दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकार केवळ इराणच्या युद्धाचे कारण पुढे करत आहे, मात्र मागील पाच वर्षांत जेव्हा कच्च्या तेलाचे दर कमी होते, तेव्हा त्याचा फायदा जनतेला का दिला नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कोल्हापुरातील परिस्थितीवर भाष्य करताना पाटील यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्यातील ३०% पेट्रोल पंप बंद असून सरकार जनतेला सुरळीत इंधन पुरवठा करण्यात अपयशी ठरले आहे. सरकारने केवळ आश्वासने न देता वाढलेली महागाई कमी करावी आणि इंधन दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी यावेळी  केली. 

या आंदोलनामुळे पेट्रोल पंपांवरील नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून, इंधन दरवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes