SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा : माणिक पाटील (चुयेकर)

schedule31 Jul 26 person by visibility 345 categoryउद्योग

कोल्हापूर : सहकार कायद्यातील निवडणूक विषयक नियमांमुळे कोल्हापूर सर्किट बेंचने ठरवून दिलेला ९० दिवसांच्या कालावधीत गोकुळची निवडणूक घेणे शक्य नाही. यामुळे या निवडणुकीसाठी विभागीय सहकार उपनिबंधकांना आवश्यक तो कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी श्रीराम दूधसंस्था, चुयेचे संचालक, पदवीधर मित्र माणिक पाटील (चुयेकर) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

फडणवीस सरकार दीर्घकाळसाठी स्वतःच्या सोयीच्या लोकांचे खाजगी प्रशासक मंडळ गोकुळवर नेमल या अनावश्यक भीतीपोटी मागील संचालक मंडळाने, संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर लगेचच निवडणूक घेण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने निवडणुका ९० दिवसांच्या आत घेण्याचा निर्णय दिला होता.


परंतु सहकार कायद्यातील निवडणूकविषयक नियमनुसार या निवडणूक प्रक्रियेस आवश्यक तो कालावधी न दिल्यास गोकुळ निवडणुकीचा अंतिम निकाल कायद्याच्या कचाट्यात अडकून काही सभासद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातील. यामुळे नवीन संचालक मंडळ स्थापन होण्यास प्रदीर्घ कालावधी जाईल असे प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes