SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

लाचखोर निमतानदाराचा मुखवटा फाडला; शिरोळ भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

schedule29 Jun 26 person by visibility 332 categoryगुन्हे

कोल्हापूर : वारस आणि फेरफार नोंदीच्या नावाखाली गरिबांची लूट करणाऱ्या एका भ्रष्ट अधिकाऱ्याचा कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पर्दाफाश केला आहे. शिरोळ येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील निमतानदार संजय बापू तेली (वय ५२, रा. आळते, ता. हातकणंगले) याला २ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तक्रारदाराच्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेवर वारस आणि फेरफार नोंद करण्यासाठी तक्रारदाराने शिरोळ येथील भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. हे काम निमतानदार संजय तेली याच्याकडे होते. काम पूर्ण करण्यासाठी तेली याने तक्रारदाराकडे २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने कोल्हापूर एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने केलेल्या पडताळणीमध्ये तेली याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना तेलीला रंगेहात अटक करण्यात आली. सध्या त्याच्यावर शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


ही कारवाई एसीबीचे पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या घटनेमुळे सरकारी कामांसाठी लाच मागणाऱ्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes