SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

बिष्णोई ००७ गँगचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड कोल्हापुरात जेरबंद! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची थरारक कारवाई

schedule28 Aug 26 person by visibility 491 categoryगुन्हे

कोल्हापूर : आंतरराज्यीय संघटित गुन्हेगारी विश्वात थरकाप उडवणारी मोठी कारवाई करत, कुख्यात बिष्णोई टोळीचा प्रमुख श्यामलाल गोवर्धनराम पुनिया आणि त्याचा साथीदार श्रीराम मांजु यांना कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत धाडसी व यशस्वी कारवाई करत जेरबंद केले आहे.  

​अटक करण्यात आलेला श्यामलाल गोवर्धनराम पुनिया उर्फ बिष्णोई हा '००७' या आंतरराज्यीय संघटित गुन्हे टोळीचा प्रमुख असून, त्याच्याविरुद्ध खुनाचे प्रयत्न, दरोडे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यासारखे तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, त्याने सन २०२० मध्ये कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर पोलिसांच्या दिशेने फायरींग केले होते. दुसरा आरोपी श्रीराम मांजु उर्फ पाचाराम बिष्णोई याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणण्यासारखे तब्बल २६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.  

​हे दोन्ही कुख्यात गुन्हेगार कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कामकाजासाठी येणार असल्याची गुप्त माहिती राजस्थान पोलीस व पिंजर-चिंचवड आयुक्तालयाकडून कोल्हापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने सत्र न्यायालयाच्या परिसरात अत्यंत गोपनियरीत्या सापळा रचला.  
​ न्यायालयाच्या आवारातील पार्किंगमधून बाहेर पडताना पोलिसांना पाहताच दोन्ही आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या ब्रिझा कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मुख्य गेट बंद करून आणि प्रसंगावधान दाखवत त्यांना अवघ्या काही मिनिटांतच मुसक्या आवळल्या.  

 आरोपी श्रीराम मांजु यास पुढील तपासकामी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे, तर श्यामलाल पुनिया याला तातडीने पुढील कारवाईसाठी राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes