SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिलांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचे लघुउद्योग सुरू करावेत : पूनमताई तोडकरबाल लैंगिक शोषण, अत्याचार आणि हिंसेपासून बचाव व उपचार जागतिक दिन: एक सामाजिक जबाबदारीपालकसचिव जिल्ह्यांमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देशगोकुळ दूध संघाच्या नूतन संचालकांनी घेतली उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेटशिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसह विविध विकासकामांसाठी शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट!भारतीय जनता युवा मोर्चाच्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात कोल्हापूर : लीशा हॉटेल ते कदमवाडी रस्त्यावरील अनधिकृत पत्रा शेडवर महापालिकेची कारवाईआमदार यड्रावकर यांच्या हस्ते कवठेसार व कोथळीत ८८.२८ लाख रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात मंगळवारी 'कै. रामचंद्र कबनूरकर स्मृती' भव्य खुली एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धासंजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. रविंद्र धोंगडी यांना ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड’ने सन्मानित

जाहिरात

 

मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधी

schedule13 Oct 26 person by visibility 318 categoryशैक्षणिक

◼️डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे आयोजन

कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल जबाबदारी, नेतृत्वगुण आणि संवादकौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट  येथे ‘सायबर हायजीन मॉडेल युनायटेड नेशन्स (एमयूएन) २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातील निवडक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील एमयूएनमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे . 

 इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘स्टे सेफ ऑनलाइन’ उपक्रमासह इंडियन सायबर सिक्युरिटी एक्सलन्स असोसिएशन, डिजिटल इंडिया, सी-डॅक आणि भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक  यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे.

इयत्ता ८ वी ते १०वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी २४ व २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होणारा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसोबत प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाला सहभागी होता येणार आहे. या उपक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे. 
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मॉडेल युनायटेड नेशन्सच्या कार्यपद्धतीचा अनुभव, विविध जागतिक विषयांवर चर्चा, सार्वजनिक भाषण, संशोधन, नेतृत्व आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमातील निवडक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील एमयूएनमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य पारितोषिके व सन्मान देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, ऑनलाइन सुरक्षितता आणि जबाबदार डिजिटल नागरिकत्व याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, शिक्षक समन्वयक म्हणून प्रा. अमृत काजवे, तर विद्यार्थी समन्वयक म्हणून कु. अंजिलाह धलाईत आणि कु. युगंधर साळुंखे काम पाहतील.
इच्छुक शाळांनी अधिक माहितीसाठी डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes