SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकी मध्ये पीबीएल दिन उत्साहात संपन्न

schedule02 Jun 26 person by visibility 376 categoryशैक्षणिक

वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पाधारित शिक्षण (Project Based Learning - PBL) दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.  या कार्यक्रमासाठी सीआयआयचे अध्यक्ष तथा श्री स्फेरोटेकचे कार्यकारी संचालक वीरेंद्र पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या उपक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा. डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील तसेच कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांच्या हस्ते झाले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने, पीबीएल समन्वयक प्रा. एस. व्ही. निकम तसेच प्रा. एम. व्ही.जाधव, प्रा. आर डी गाडे,  प्रा.आर आर चव्हाण, प्रा.एन एम शिंदे, प्रा .ए एन मलंगौडा, प्रा .ए ए पारेख, प्रा.ओ आर जंगम, प्रा.एस के जंत्रे,तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

पीबीएल दिनानिमित्त आयोजित प्रकल्प प्रदर्शनामध्ये अभियांत्रिकीच्या सर्व शाखांतील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सुमारे २००० विद्यार्थ्यांनी ३५० हून अधिक प्रकल्प गटांच्या माध्यमातून आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, समस्या निराकरण कौशल्य आणि नवोपक्रमशील दृष्टिकोनाचे उत्कृष्ट दर्शन या प्रदर्शनातून घडले.

यावेळी वारणा पीबीएल पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा वीरेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगत व्यक्त करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या प्रकल्पांचे उत्पादन विकास, उद्योजकता आणि स्टार्टअप्समध्ये रूपांतर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्री वारणा रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशन (कलम ८ कंपनी) मार्फत विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप क्षेत्रात पुढे जाण्यासाठी विविध प्रकारचे सहकार्य उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी विद्यार्थ्यांनी प्रकल्पाधारित शिक्षणाच्या माध्यमातून उद्योगजगताच्या गरजांशी सुसंगत कौशल्ये विकसित करावीत, असे आवाहन केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes