शिवाजी विद्यापीठात पंडित नेहरू जयंती
schedule14 Nov 25 person by visibility 57 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. अजित कोळेकर, डॉ. गोविंद कोळेकर, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे,
डॉ. नीलांबरी जगताप, उपकुलसचिव गजानन पळसे, सुरेखा आडके यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.