SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंध

schedule16 Jun 26 person by visibility 390 categoryराज्य

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 19 व 20 जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये विमानतळ परिसर तसेच संपूर्ण कोल्हापूर व इचलकरंजी शहरात दिनांक 19 व 20 जून या कालावधीत ड्रोन कॅमेरे उडविणे आणि चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आली असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते कोल्हापूर विमानतळ, पोलीस परेड ग्राउंड व फुटबॉल मैदान, कसबा बावडा, महालक्ष्मी मंदिर, शासकीय विश्रामगृह, जनता सहकारी बँक, इचलकरंजी, कलाप्पा आवाडे टेक्सटाईल पार्क (KATP), इचलकरंजी येथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ परिसरासह संपूर्ण कोल्हापूर व इचलकरंजी शहरात 19 व 20 जून 2026 या कालावधीत ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास बंदी राहणार आहे.

  या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes