कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्येवर प्रशासक के.मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलिस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांचाकडून आढावा
schedule12 Nov 25 person by visibility 4 categoryमहानगरपालिका
▪️वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाढत्या वाहतूक समस्येचा आढावा आज जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयात घेण्यात आला. या बैठकीला प्रशासक के. मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे तसेच दरेकर उपस्थित होते.
वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी शहरातील वाहतूक व पार्किंग संदर्भातील समस्यांचा स्लाइडशोद्वारे सविस्तर माहिती सादर केला. या बैठकीत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्यांवर झेब्रॉ क्रॉसिंग पट्टे, साईड व रस्त्यामध्ये पट्टे मारण्याची मागणी वाहतूक विभागाकडून करण्यात आली. तसेच संभाव्य गर्दीच्या ठिकाणी अतिक्रमण हटवून गर्दी टाळण्यासाठी शहर वाहतूक विभाग व महापालिका अतिक्रमण विभाग यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी दिल्या.
कावळा नाका येथे लक्झरी बसस्थानक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तेथे लाईटची, टॉयलेटची व बंद गाळे भाड्याने देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियंता यांना दिल्या. सीएसआर फंडातून पार्किंगचे बोर्ड तयार करावेत. तसेच शहरातील सर्व सिग्नल सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक सिग्नलला बॅकअप वीजपुरवठा देणेच्या सूचना दिल्या. अनाधिकृत खाऊ गल्लीमुळे पार्किंगला अडथळा होत असेल तर तेथे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी व आवश्यक उपकरणे उभारणीसाठी महापालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, प्रकल्प अभियंता सुरेश पाटील व वाहतूक सल्लागार जय रेवणकर उपस्थित होते.