SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचे सानुग्रह अनुदान

schedule31 Aug 26 person by visibility 402 categoryराज्य

▪️आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कुटुंबीयांना धनादेश सुपूर्द

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील एरंडोळ येथील कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेल्या आशा स्वयंसेविका स्व. दर्शना शिवाजी गोवेकर यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानाचा धनादेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

कर्तव्य बजावत असताना आशा स्वयंसेविका अथवा गटप्रवर्तक यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आला होता. या शासन निर्णयानुसार राज्यात प्रथमच या सानुग्रह अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे.

स्व. दर्शना गोवेकर यांची ग्रामपंचायतीमार्फत आशा स्वयंसेविका म्हणून निवड करण्यात आली होती. त्या २२ एप्रिल २०११ ते २६ जुलै २०२४ या कालावधीत आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत होत्या. कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातानंतर २९ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य शासनाकडे सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार स्व. दर्शना गोवेकर यांच्या कुटुंबास १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले असून, त्याचा धनादेश कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत आशा स्वयंसेविका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या सेवेला शासनाकडून मिळालेली ही आर्थिक व सामाजिक दखल त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधार देणारी ठरली आहे.

याप्रसंगी आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरीता थोरात,  . अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. दीपक मेंढेकर सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी बर्गे तसेच श्रीमती खान उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes