SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कौशल्य, सेवाभाव महत्त्वाचा : डॉ. शर्मा

schedule03 Aug 26 person by visibility 299 categoryशैक्षणिक

◼️डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत  

कोल्हापूर : हॉस्पिटॅलिटी उद्योग हा सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उत्तम कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राकेश कुमार शर्मा यानी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये  प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या तसेच विद्यार्थी पालक हस्ते  दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला , कुलसचिव डॉ व्ही व्ही भोसले, आय क्यू ए सी संचालक डॉ शिंपा शर्मा, प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. शर्मा म्हणाले, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिला जातो. महाविद्यालयीन जीवनात व्यक्तिमत्त्व विकास, व्यावसायिक नैतिकता आणि ग्राहककेंद्री सेवा वृत्ती जोपासल्यास देश-विदेशातील नामांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स, क्रूझ, एअरलाईन्स तसेच पर्यटन उद्योगात उज्ज्वल करिअर घडविण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. 

प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व  विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरा, शिस्त, आधुनिक सुविधा तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.

कुलसचिव  डॉ. व्ही. व्ही भोसले यांनी देश विदेशातील करीअर संधीबाबत मार्गदर्शन केले. विद्यापीठात उपलब्ध असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाबाबतही त्यांनी माहिती दिली. 

विद्यापीठाच्या आय क्यू ए सी संचालक डॉ शिंपा शर्मा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. सुरज यादव यांनी केले. आभार प्रा. रोहन हवालदार यांनी मानले. यावेळी डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनिअरिंग अँड मनेजमेंट चे प्राचार्य डॉ. अजित पाटील, अलायड हेल्थ सायन्स चे कोर्डीनेटर डॉ. आर एस पाटील,  प्रा. रुबेन काळे,   कर्मचारी, विद्यार्थी , पालक  उपस्थित होते. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी  पाटील,  उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes