SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

राष्ट्रवादीतील ‘पेल्यातील वादळ’ पेल्यातच शमले; 'गोकुळ' आणि साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य!

schedule27 May 26 person by visibility 424 categoryराजकीय

कोल्हापूर : "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत सर्व नेते, खासदार आणि आमदारांनी उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रावहिनी पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वादाची चर्चा म्हणजे केवळ 'पेल्यातील वादळ' होते आणि ते पेल्यातच संपले आहे," असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले. आज बुधवार, दि. २७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता कोल्हापूर विमानतळावर इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांशी ते बोलत होते. प्रफुल पटेल काही कामानिमित्त या बैठकीला अनुपस्थित होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांतून झालेल्या टीकेमुळे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, "त्यांना 'व्हिलन' ठरवण्यात आल्याने आणि टार्गेट केले गेल्याने त्यांनी आपली खंत बोलून दाखवली होती. परंतु, संपूर्ण पक्ष पूर्णपणे एकसंघ आहे. तसेच अर्थ खाते आमच्याकडे होते आणि ते नंतर देण्याचे ठरले आहे, त्याबाबतचा निर्णयही लवकरच होईल." आगामी २०२९ च्या निवडणुकीबाबत छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, निवडणुका आल्या की सर्वच पक्ष तयारी करतात, मात्र आम्ही आगामी निवडणुका 'महायुती' म्हणूनच एकत्रित लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

▪️ 'गोकुळ'ची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आणि जिंकणार!
आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या 'राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडी'वर मुश्रीफांनी थेट निशाणा साधला. "त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे आणि महायुतीने काय करावे हा आमचा. 'गोकुळ'ची निवडणूक महायुती म्हणून लढायची, जिंकायची आणि चेअरमनही महायुतीचाच करायचा, हे आमचे ठरले आहे," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागावाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, सध्या जागावाटपावर बोलणे अतिघाईचे ठरेल. आता फक्त संस्थांचे ठराव गोळा करणे, कच्ची व पक्की मतदार यादी तयार करणे हा पहिला टप्पा सुरू आहे. मतदार यादी पूर्ण झाल्यानंतरच जागावाटपाचा कार्यक्रम ठरेल आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक लागण्याचा अंदाज आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळेच ही निवडणूक वेळेवर होत असून, कोणाला चपराक बसली असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

▪️ सीपीआरमधील केबिन वादावर लवकरच तोडगा; अधिकाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालयातील अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यातील केबिन वादावर मंत्री मुश्रीफ यांनी सामोपचाराची भूमिका घेतली. "वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ही सर्व मालमत्ता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग झाली आहे. या वादावर मी आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर एकत्र बसून योग्य तोडगा काढू. सीपीआरच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते होणार आहे, तोपर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी घाईगडबड न करता शांत राहावे," असे आवाहन त्यांनी केले.

▪️साखर कारखानदार सामूहिक आत्महत्येच्या उंबरठ्यावर; महायुतीचे शिष्टमंडळ दिल्लीला रवाना
"राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारी सध्या प्रचंड मोठ्या संकटात सापडली आहे. एका साखर कारखानदाराने तर सर्व कारखानदारांवर सामूहिक आत्महत्येची वेळ आल्याची भीती व्यक्त केली आहे," अशी चिंता मुश्रीफ यांनी बोलून दाखवली.
याच गंभीर पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचे शिष्टमंडळ आज दिल्लीला गेले आहे. साखरेचे व इथेनॉलचे दर वाढवणे, इथेनॉलची उचल करणे, को-जनरेशनचे दर वाढवणे, कर्जाचे पुनर्गठन (रिस्ट्रक्चर) करणे, सॉफ्ट लोन देणे आणि व्याजाचा भार केंद्र सरकारने उचलणे या मागण्यांवर दिल्लीतील बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन केंद्र सरकार नक्कीच मार्ग काढेल, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेवटी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes