SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

२७ कोटींची थकबाकी ! कोल्हापूर महापालिकेने ‘स्टार बझार’ इमारत केली सील; ...पण न्यायालयाच्या स्थगिती आदेशाने काही तासांतच कारवाई स्थगित!

schedule31 Jul 26 person by visibility 487 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाने घरफाळ्याच्या तब्बल २७ कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणी घाटगे पाटील ऑटोमोबाईल्सच्या मिळकतीतील स्टार बझारची इमारत शुक्रवारी दुपारी सील केली. मात्र, सायंकाळी कोल्हापूर सर्किट बेंचकडून सील न करण्याबाबत स्थगिती आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने पुढील कारवाई थांबवून इमारतीवरील सील काढले.

महापालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाकडून थकीत घरफाळा वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली. संबंधित मिळकतीवर सुमारे २७ कोटी रुपयांची घरफाळा थकबाकी असल्याने दुपारी सीलची कारवाई करण्यात आली होती. 

यानंतर संबंधित मिळकतधारकांनी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता कोल्हापूर सर्किट बेंचकडील स्थगिती आदेश कारवाईच्या ठिकाणी सादर केला. न्यायालयाच्या आदेशाची दखल घेत महापालिकेने पुढील कारवाई तात्पुरती स्थगित केली तसेच लावण्यात आलेले सील काढण्यात आले.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार व उपआयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त विजय पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, चारही विभागीय कार्यालयांचे कर अधीक्षक, कनिष्ठ लिपिक तसेच परवाना विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes