SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

गोकुळ शिरगांव एमआयडीसीत कंपनीतून कार्बाइड इन्सर्ट व घरफोडीचा माल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद

schedule01 Sep 26 person by visibility 355 categoryगुन्हे

◼️स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत व दोन गुन्हे उघडकीस


कोल्हापूर : गोकुळ शिरगांव एमआयडीसी परिसरातील कंपनीमधून कार्बाइड इन्सर्ट आणि घरफोडीचा इतर माल चोरणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकूण दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी हे गुन्हे लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे विशेष पथक तयार केले होते.

तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवली असता, गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आदिनाथ नरसिंगे आणि त्याचा साथीदार चोरीचा माल विकण्यासाठी शिरोली एमआयडीसीमधील हिंदुस्थान इंडस्ट्रीजसमोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

आरोपींची नावे:
 * आदिनाथ संजय नरसिंगे (वय २७, रा. माळवाडी इंगळेकर कॉलनी, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले)
 * शाहरुख खुदबुद्दीन जिरगाळे (वय २४, रा. रहेमतनगर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, मूळ गाव- आयगळी, ता. अथनी, जि. बेळगांव)
हस्तगत केलेले साहित्य व उघडकीस आलेले गुन्हे:
पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून एमटीएफएनएल, डीसीएलएनएल, पीसीएलएनआर, डायमीटर, डीएनएमजी, टीएनएमजी, सीएनएमजी कंपनीचे टूल, स्पेअर पार्ट आणि वेगवेगळ्या आकाराचे इन्सर्ट असा एकूण २,९०,०००/- रुपये किमतीचा माल जप्त केला. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्याकडील गु.र.नं. ८२/२०२६ आणि गु.र.नं. ९७/२०२६ असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. मुख्य आरोपी आदिनाथ नरसिंगे याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३ गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes