SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापूर: ॲड. विवेकानंद घाटगे यांचा ८ जुलै रोजी ग्रंथतुला करून जाहीर सत्कार

schedule06 Jul 26 person by visibility 243 categoryसामाजिक

कोल्हापूर : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. विवेकानंद घाटगे यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. 'मानवतावादी सांस्कृतिक चळवळ'च्या वतीने हा कार्यक्रम बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

 सत्कारमूर्तींचा सत्कार पुष्पगुच्छ किंवा शाल-श्रीफळाऐवजी वही, पेन आणि पुस्तक भेट देऊन करण्यात येणार आहे. खा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, महापौर रुपाराणी निकम, डॉ. रमेश विवेकी आणि उत्तमदादा कांबळे यांच्या हस्ते ॲड. घाटगे यांचा सत्कार होणार आहे.
ज्ञानदान आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात असून, या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष भरत रसाळे आणि आयोजकांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला भरत रसाळे, अनिल म्हमाने, डॉ. कपिल राजहंस, सुरेश केसरकर, अॅड. करुणा विमल, विश्वास तरटे, अंतिमा कोल्हापूरकर, अभिजीत मासुर्लीकर, गंगाधर म्हमाने.अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes