भ्रष्टाचार निर्मूलन संदर्भातील "चला भ्रष्टाचार संपवूया" जागरुकता कार्यशाळेचा व्यापारी-उद्योजकांनी लाभ घ्यावा
schedule07 Dec 25 person by visibility 96 categoryसामाजिक
▪️कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे आवाहन
कोल्हापूर : व्यापारी-उद्योजकांच्या शासकीय कामकाजा संदर्भात केंद्रीय शासकीय अधिकारी व कर्मचारी (उदा. बँका, पोस्ट ऑफीस, भविष्य निधी कार्यालय, आयकर कार्यालय, केंद्रीय जीएसटी विभाग, रेल्वे विभाग इत्यादी) यांनी लाचेची मागणी केल्यास कोणती खबरदारी घ्यावी व याबाबत कोठे संपर्क साधावा याबाबत केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI), लाचलुचपत प्रतिबंधक शाखा (ACB) पुणे व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (KCCI) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० वा. कोल्हापूर चेंबरच्या कार्यालयात "चला भ्रष्टाचार संपवूया" या जागरुकता कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेत *सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक शाखा, पुणे च्या पोलीस निरिक्षक शीतल पाटील* या व त्यांचे सहकारी व्यापारी-उद्योजक यांना भ्रष्टाचार निर्मूलन संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
तरी चला भ्रष्टाचार संपवूया या जागरुकता कार्यशाळेस व्यापारी-उद्योजकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.