कोल्हापुरात केशवराव भोसले नाटयगृह लगत असणारे 12 दुकानगाळे, 2 मटण दुकान व 3 शेड हटविले
schedule12 Nov 25 person by visibility 3 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका इस्टेट विभागामार्फत बी वॉर्ड मंगळवार पेठ येथील शाहू खासबाग कुस्ती मैदान व संगीतसुर्य केशवराव भोसले परिसरातील सि.स.न. 2558 ख या जागा महापालिकेच्या ताब्येत आलेली आहे.
यामध्ये 12 दुकानगाळे, 2 मटण दुकान व 1 खुली जागा व विनापरवाना अतिक्रमण केलेली 03 शेडचा समावेश आहे. सदरची सर्व बांधकामे आज निष्काशीत करण्यात आली.
ही कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरण धनवाडे, सहा.आयुक्त श्रीमती स्वाती दुधाणे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, अतिक्रमण विभाग, विभागीय कार्यालय क्र. 02 व अग्निशमन विभाग यांचे संयुक्तीक पथकाकडून करण्यात आली.