कोल्हापूर शहरातील विनापरवाना शेड, हातगाड्या व डिजीटल बोर्डावर कारवाई
schedule09 Dec 25 person by visibility 72 categoryमहानगरपालिका
▪️आजच्या कारवाईत 11 विनापरवाना शेड, 13 हातगाड्या व 7 अनाधिकृत डिजीटल बोर्ड जप्त
कोल्हापूर : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार व मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 नुसार शहरातील अनाधिकृत व बेकायदेशरी विनापरवाना शेड, हातगाड्या व अनाधिकृत डिजीटल बोर्डवर आज कारवाई करण्यात आली. विभागीय कार्यालय क्र.3 राजारामपूरी व अतिक्रमण निर्मुलन पथकाअंतर्गत आज खानविलकर पंप ते जिल्हाधिकारी कार्यालया रोड ते सर्किट हाऊस व यल्लमा मंदीर चौक येथील 11 विनापरवाना शेड, 13 हातगाड्या व 7 अनाधिकृत डिजीटल बोर्डवर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई महापालिकेच्यावतीने येथून पुढेही सुरु राहणार असून अशा प्रतिबंधित ठिकाणी व्यवसाय करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करुन त्यांचे साहित्य जप्त करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त जयंत जावडेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नियंत्रणाखाली उप-शहर अभियंता अरुण गुर्जर, अतिक्रमण अधिक्षक विलास साळोखे, सहा.अधिक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, रविंद्र कांबळे व कर्मचाऱ्यां मार्फत करण्यात आली.