पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप व अंतिम मतदार याद्यांच्या प्रसिद्धीच्या तारखेत बदल
schedule14 Nov 25 person by visibility 68 categoryराजकीय
पुणे : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी - नोव्हो) तयार करण्याच्या सुरू असलेल्या कार्यक्रमात भारत निवडणूक आयोगाने सुधारणा केली आहे.
याअंतर्गत प्रारूप मतदार याद्यांच्या प्रसिद्धीचा दिनांक ३ डिसेंबर २०२५ आणि अंतिम मतदार याद्यांच्या प्रसिद्धीचा दिनांक १२ जानेवारी २०२६ असा करण्यात आला आहे,
असे विभागीय आयुक्तालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांनी कळविले आहे.