डी. बी. पाटील सरांचं कार्य आभाळाएवढं : खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज; डी. बी. पाटील सरांच्या कार्याला मापदंड नाही : डॉ. बी. एम. हिर्डेकर
schedule12 Nov 25 person by visibility 47 categoryसामाजिक
▪️शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ स्व. दादासाहेब बळवंत तथा डी. बी. पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या स्मृतींचा नंदादीप अखंड तेवत राहावा आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या घटकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने शिक्षणतज्ज्ञ स्व. डी. बी. पाटील फाऊंडेशन व श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील पुरस्कार वितरण सोहळ्या'चे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज तर प्रमुख पाहुणे-वक्ते डॉ. बी. एम. हिर्डेकर हे उपस्थित होते. तसेच शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे व चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्व. डी. बी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने सोहळ्याला प्रारंभ झाला. फाऊंडेशनच्या कार्याध्यक्ष सौ. सविता पाटील यांनी पुरस्कार वितरणाबद्दलचा फाउंडेशनचा उद्देश तसेच फाऊंडेशनच्या कार्याची आणि भविष्यातील उपक्रमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
▪️पुरस्काराचे मानकरी
★ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील शिक्षणभूषण पुरस्कार - डॉ. बी. एम. हिर्डेकर (ज्येष्ठ मार्गदर्शक, शिक्षक प्रशिक्षक, शिवाजी विद्यापीठ माजी परीक्षा नियंत्रक)
(स्वरूप - रोख रु. ११०००, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक, गुलाबपुष्प)
★ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार - श्री. विश्वनाथ कृष्णा फगरे (मुख्याध्यापक, श्री. भावेश्वरी माध्यमिक विद्यालय, आमरोळी)
(स्वरूप - रोख रु. ७०००, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक, गुलाबपुष्प)
★ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील संस्कारक्षम शिक्षक पुरस्कार - श्री. सत्त्याप्पा सिद्दाप्पा हजारे (साहाय्यक शिक्षक, श्रीमती भागीरथी रामचंद्र यादव हायस्कूल, सावर्डे तर्फ सातवे)
(स्वरूप - रोख रु. ५०००, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक, गुलाबपुष्प)
हे तिन्ही पुरस्कार समारंभाचे अध्यक्ष खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे-वक्ते व शिक्षणभूषण पुरस्काराचे मानकरी डॉ. बी. एम. हिर्डेकर बोलताना म्हणाले, "डी. बी. पाटील सरांचे कार्य हे सर्वसमावेशक आणि ज्याचे मोजमाप करता येणार नाही असे आहे." तर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, "महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला डी. बी. पाटील यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व लाभलं हे सौभाग्यच." आमदार प्रा. जयंत आसगावकर, बी. जी. बोराडे, डॉ. के. जी. पाटील यांनीही आपल्या मनोगतातून स्व. डी. बी. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांचे शैक्षणिक योगदान अधोरेखित केले.
आभार देवाळे हाय. व. ज्युनि. कॉलेजचे उपप्राचार्य समीर घोरपडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. निशांत गोंधळी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सौ. सुजाता शिंदे यांनी गायिलेल्या वंदे मातरम् गीताने झाली. कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष राजेंद्र पाटील, संतोष पाटील, समीर घोरपडे, हर्षदा गोसावी, प्रा. सुहास देशमुख, संदीप पंडे, सचिन पाटील, सचिन कांबळे, प्रा. निशांत गोंधळी, अशोक पाटील, युवराज साळोखे यांनी केले.