डीकेटीईचा देशपातळीवरील आयआयसी मीट मध्ये बेस्ट पोस्टर पुरस्काराने सन्मान
schedule07 Dec 25 person by visibility 92 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटने पुन्हा एकदा इन्व्होवेशन क्षेत्रात आपली भक्कम छाप उमटवत मोठे यश मिळविले आहे. एआयसीटीई आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, इंडस्ट्री इन्व्होवेशन कौन्सिल (आयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमानाने सिंबॉयसिस इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या आयआयसी रिजनल मीट - २०२५ मध्ये डीकेटीईने बेस्ट पोस्टर प्राईज पटकाविला आहे. या पुरस्कारामुळे डीकेटीईची नवकल्पना व तंत्रज्ञानातील पकड प्रादेशिक पातळीवर अधिक अधोरेखीत झाली आहे.
या देशपातळीवरील स्पर्धेत देशभरातील सुमारे १५० हून अधिक इंजिनिअरींग कॉलेजसनी सहभाग नोंदवला होता. डीकेटीईच्या विजयी पोस्टर मध्ये मागील तीन वर्षात संस्थेने इन्व्होवेशन व स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये केलेल्या प्रभावपूर्ण उपक्रमांची सुस्पष्ट व आकर्षक मांडणी करण्यात आली होती. या मांडणीचे परिक्षकांनी विषेश कौतुक केले. या पोस्टरची संकल्पना डॉ टी.आय.बागबान यांनी केली. त्यांना डॉ ए.डी. काडगे यांची साथ लाभली. पोस्टर डिझाईनमध्ये डॉ एम.सी.बुर्जी, डॉ.जी.सी. मेकळके आयआयसी आणि युक्ती सेल यांचे मोलाचे योगदान लाभले.
डीकेटीई मध्ये उपलब्ध असलेली आयडिया लॅब, इनोव्हेशन आणि स्टार्ट अप कटटा तसेच डीकेटीईतील विविध अधुनिक लॅबमार्फत विद्यार्थी व प्राध्यपकांना विविध संशोधनाचे मार्गदर्शन केले जाते. यामुळे अशा स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना या लॅबमधील सुविंधाचा लाभ होतो व देशपातळीवरील या स्पर्धेत आपली गुणवत्ता त्यांनी सिध्द करता येते.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांनी नाविन्यपूर्ण कल्पना शोधणे, उदयोजकीय कौशल्यांचा विकास करणे अदी विषयांवरती समविचारी व्यक्तींशी विविध विषयांवर उहापोह करण्यात आला. याचबरोबर या मिटमध्ये युक्ती इनोव्हेशन चॅलेंज या देशस्तरीय स्पर्धेमध्ये डीकेटीईतून निवड करण्यात आलेल्या ३ प्रकल्पांचे एआयसीटीई कडून फंडीग मिळण्यासाठी सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रा.राजेंद्र हिरेमठ यांनी डीझीटलाईझड बस पास मॅनेजमेंट सिस्टीम, इटीसीमधील विद्यार्थी अद्वैत कुलकर्णी यांनी आयओटी वर अधारित स्मार्ट कॉलर गुरांचे आरोग्य व सुरक्षतिता तर तनिशा गुलवाणी व अंकिता मोलकर यांनी ज्येष्ठांसाठी फॉल डिटेक्शन व प्रिव्हेन्शन सिस्टीम यांचे सादरीकरण केले.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थी व प्राध्यपकांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.अडमुठे,डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, आयआयसी प्रेसिडेंंट डॉ डी.व्ही.कोदवडे यांचे मार्गदर्शन लाभले.