जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय 15 व 16 रोजी सुरु
schedule12 Nov 25 person by visibility 10 categoryराज्य
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 जाहीर करण्यात आलेला आहे. राखीव जागांसाठी निवडणूका लढविण्यास इच्छुक उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर असून निवडणूक लढविणाऱ्या अर्जदारांची गैरसोय होऊ नये याकरिता शनिवार, 15 व रविवार 16 नोव्हेंबर या दोन्ही सुट्टीच्या दिवशी फक्त निवडणूकविषयक अर्ज स्विकारण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरु ठेवण्यात येत आहे.
फक्त निवडणूक विषयक अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी उपस्थित रहावे व अर्ज दाखल करुन पोहोच घ्यावी, असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य भारत केंद्रे यांनी केले आहे.
विद्यार्थीविषयक व सेवाविषयक अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांचे प्रस्ताव या दिवशी स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थीविषयक व सेवाविषयक अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांनी या दिवशी कार्यालयात गर्दी करु नये व समितीस सहकार्य करावे,
असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.