SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाव्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मानउंचगावमध्ये स्मार्ट मीटर सक्तीला शिवसेनेचा विरोध; स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम नको: विक्रम चौगुले यांचा इशाराइंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवडघरफाळा 6 टक्के सवलत योजने अंतर्गत एक दिवसांत 1 कोटी 1 लाख रुपये जमाशिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ : डॉ. संजय डी. पाटील यांची ग्वाही; आघाडीच्यावतीने कुलगुरु, प्र-कुलगुरूंचे स्वागत​"शासकीय कंत्राटदारांच्या प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी १४ जून रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय महाअधिवेशन"काळाचा ठेवा: 'आंतरराष्ट्रीय अभिलेख दिवस' आणि आपल्या वारशाचे जतनमराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मेघराज राजेभोसले यांच्या 'समर्थ पॅनेल'चा दणदणीत विजयकोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

जाहिरात

 

शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

schedule09 Jun 26 person by visibility 137 categoryसामाजिक

कोल्हापूर : प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'च्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा संताप आज रस्त्यावर उतरला. सुपीक जमिनी हिरावून घेणाऱ्या या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी  विराट मोर्चा काढण्यात आला  काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला.

या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी "विकासकामांच्या नावाखाली आम्हाला भूमिहीन करण्याचा डाव आम्ही सहन करणार नाही," असा इशारा दिला. "आम्हाला महामार्ग नको, आमची काळी आई (जमीन) हवी आहे," अशी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी आपला लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत आहेत.

आंदोलनाचे नेतृत्व करताना आ. सतेज पाटील यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "शक्तीपीठ महामार्ग म्हणजे केवळ कंत्राटदारांचे कमिशन आणि खिसे भरण्याचा खटाटोप आहे. अकरा नद्या ओलांडून येणारा हा रस्ता अनेक गावे आणि मंदिरांचे नुकसान करणारा आहे. भाजपचे हिंदुत्व आता कुठे गेले आहे? दीड-दोनशे मंदिरांना फटका बसणार असताना सरकार गप्प का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सरकारचा हा मनमानी कारभार कोल्हापूरची जनता कदापि सहन करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

गेल्या सव्वा दोन वर्षांपासून हा लढा सुरू असून, सरकारने बळजबरीने जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षाही भीषण आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांनी दिला आहे. महामार्गामुळे पाच-दहा किलोमीटर परिघात येणाऱ्या गावांसाठी पुराचे संकट निर्माण होईल, अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली.

 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या या मोर्चाने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले असून, आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes