SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थिनींना ‘आयईईई’ शिष्यवृत्ती

schedule03 May 26 person by visibility 355 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कसबा बावडा येथील दोन विद्यार्थिनींनी प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स वुमन्स इन इंजीनियरिंग (आयईईई डब्ल्यूआयई) शिष्यवृत्ती मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ ३० विद्यार्थिनींची निवड या शिष्यवृत्तीसाठी करण्यात आली आहे. यामध्ये महाविद्यालयातील द्वितीय वर्ष, इलेक्ट्रॉनिक्सच्या ऋतुजा कुंथे आणि सिद्धी कोपार्डे यांचा समावेश आहे.

या शिष्यवृत्तीअंतर्गत विद्यार्थिनींना लॅपटॉप, मोफत आयईईई कोर्सेस तसेच जागतिक स्तरावर प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या दोन्ही विद्यार्थिनींना डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्याहस्ते हे लॅपटॉप प्रदान करण्यात आले आहेत.

या यशाबद्दल ऋतुजा व सिद्धी यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे,  कुलसचिव डॉ. लितेश मालदे, विभागप्रमुख डॉ. तानाजीराव मोहिते- पाटील, प्रा. मनीषा भानुसे यांनी अभिनंदन केले.

IEEE स्टुडंट ब्रांच काउन्सेलर डॉ. मनिषा विकास भानुसे यांनी सांगितले की, “हे यश विद्यार्थिनींच्या कठोर परिश्रमाचे आणि संस्थेतील उत्कृष्ट मार्गदर्शनाचे फलित असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.”

महाविद्यालयाच्या IEEE स्टुडंट ब्रांचच्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षात मिळालेले हे यश विशेष मानले जात असून, यामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी बळ मिळाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes