कोरे अभियांत्रिकीत इंडस्ट्री रेडी इंजिनिअर (IRE) प्रोग्रामचा प्रारंभ
schedule02 Nov 25 person by visibility 84 categoryशैक्षणिक
वारणानगर : तात्यासाहेब कोरे इंन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागात इंडस्ट्री रेडी इंजिनिअर (२०२५-२६) या प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., चेंबूर, मुंबई या नामांकित कंपनीचे जनरल मॅनेजर धर्मेंद्र म. रामटेके यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी होते. यावेळी प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड रत्नागिरीचे रमेश डोईफोडे, रासायनिक विभाग प्रमुख डॉ. के. आय. पाटील, प्रोग्रामचे नियोजक प्रा. व्ही. ए. भोसले, डॉ. पी. बी. देहनकर तसेच रासायनिक विभागातील सर्व प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी प्रा. एन. एच. पाटील आणि कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना धर्मेंद्र रामटेके यांनी अभियांत्रिकी कॉलेज आणि आर.सी.एफ. यांच्यातील २० वर्षांच्या सहकार्याचा आढावा घेतला. तांत्रिक शिक्षणासोबत नेतृत्वगुण व परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या कौशल्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
आतापर्यंत झालेल्या सहा दिवसांच्या या प्रोग्राममध्ये फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड रत्नागिरी, आर.सी.एफ. मुंबई, एस.व्ही. इंजिनिअर्स अँड कन्सल्टन्सी छत्रपती संभाजीनगर, क्वालिटास टेक्नो सोल्युशन्स प्रा. लि. कोल्हापूर, ईज टेक्नॉलॉजी कोल्हापूर, यूटीपी पेट्रोनास युनिव्हर्सिटी मलेशिया, गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स लि. मुंबई आणि प्राज इंडस्ट्री लि. पुणे यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला व बी.टेक. रासायनिक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. व्ही. ए. भोसले यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले. टी.पी.ओ. प्रा. पी. जे. पाटील आणि डॉ. पी. बी. देहनकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली. कार्यक्रमाचे अतंर्गत नियोजन तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी केले. तसेच प्रा. मनिष पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.