SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सामन्यावर लावला जात होता सट्टा; ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

schedule05 May 26 person by visibility 344 categoryगुन्हे

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गावरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. ४ मे २०२६ रोजी रात्री मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमधील आयपीएल सामन्यावर मोबाईल ॲपद्वारे जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने हॉटेलमधील रूम नंबर १०२ वर छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी फारुख नजीर मुल्लाणी, जितेंद्र आप्पासाहेब घोडके, अजित बाळासो कोरवी आणि जॉन्सन जेरुन फर्नांडीस या चार इसमांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अजित कोरवी हा बेटिंगचा मालक असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपींकडून रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेटसह एकूण ३,०५,८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes