SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गडहिंग्लज-आजरा 'बायपास'साठी धनंजय महाडिक संसदेत कडाडले; वाढत्या अपघातांकडे वेधले लक्ष!‘गोकुळ’ मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतराव चव्‍हाण यांना अभिवादन ...परिवहन समितीचे नूतन सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर; केएमटी स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेसुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना (उबाठा) आक्रमक; आजपासून महापालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषण!आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणकोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूर

जाहिरात

 

सुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना (उबाठा) आक्रमक; आजपासून महापालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषण!

schedule12 Mar 26 person by visibility 119 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रलंबित 'आकृतीबंध' मंजूर करावा आणि 'शहर पथविक्रेता समिती' तातडीने अधिसूचित करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज, गुरुवार १२ मार्च २०२६ पासून महाविकास आघाडीच्या वतीने लाक्षणिक साखळी उपोषण पुकारण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले असून, राज्य सरकारला यापूर्वीच पत्राद्वारे निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता.

राजेश लाटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुधारित आकृतीबंधासह सेवाप्रवेश नियमांना गेल्या दोन वर्षांपासून नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळालेली नाही. राज्यातील इतर महापालिकांच्या नियमांना मंजुरी मिळाली असताना कोल्हापूरलाच का डावलले जात आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आकृतीबंधाअभावी मनपातील भरती आणि पदोन्नती प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असून, अपुऱ्या मनुष्यबळामुळे दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.

दुसरीकडे, २०२४ मध्ये स्थापन झालेली २० सदस्यांची 'शहर पथविक्रेता समिती' (फेरीवाला समिती) अद्याप अधिसूचित करण्यात आलेली नाही. यामुळे शहरात फेरीवाला धोरण निश्चित करता येत नसून, अनियंत्रित अतिक्रमणांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. निवडून आलेल्या सदस्यांच्या तक्रारींकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

व्यापक जनहित आणि मनपाच्या बळकटीकरणासाठी हे दोन्ही प्रश्न ४८ तासांत निकाली काढावेत, अशी विनंती 'मविआ'ने केली होती. मात्र, प्रशासनाकडून ठोस हालचाली न झाल्याने अखेर आजपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हे साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. या आंदोलनात शिवसेनेचे विजय देवणे, दुर्वास कदम,  भारती पवार, तसेच काँग्रेसचे नगरसेवक नगरसेविकास सहभागी झाल्या होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes