SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी : मंत्री चंद्रकांत पाटीलसीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; 466 विद्यार्थ्यांपैकी 146 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुणएकसारख्या मतदार ओळखपत्र क्रमांकांचा प्रश्न भारत निवडणूक आयोगाने सोडवलाइचलकरंजी येथे ३०,०००/- रूपयांची लाच स्वीकारताना महावितरण विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता जाळ्यातजिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजनअँग्लो उर्दू हायस्कूल शिरोली (पु.) एस.एस.सी. चा निकाल 100 टक्केकोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू, भाविकांना आवाहनमहाराष्ट्राचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के; कोकण विभागाची बाजीग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त सुमारे १५ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभकळंबा येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीचा पालखी सोहळा, कुंकुमार्चन सोहळा मोठ्या उत्साहात

जाहिरात

 

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

schedule11 Apr 25 person by visibility 228 categoryराज्य

मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री  फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आदींनीही महात्मा फुले यांना अभिवादन केले.

▪️ मंत्रालयात अभिवादन
मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, विजय शिंदे आदींसह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

▪️ विधान भवनात अभिवादन
मुंबई : थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव मेघना तळेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी राजेश तारवी, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने, कक्ष अधिकारी प्रदीप टिबे, विजय काळे यांचेसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes