SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवडघरफाळा 6 टक्के सवलत योजने अंतर्गत एक दिवसांत 1 कोटी 1 लाख रुपये जमाशिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ : डॉ. संजय डी. पाटील यांची ग्वाही; आघाडीच्यावतीने कुलगुरु, प्र-कुलगुरूंचे स्वागत​"शासकीय कंत्राटदारांच्या प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी १४ जून रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय महाअधिवेशन"काळाचा ठेवा: 'आंतरराष्ट्रीय अभिलेख दिवस' आणि आपल्या वारशाचे जतनमराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मेघराज राजेभोसले यांच्या 'समर्थ पॅनेल'चा दणदणीत विजयकोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाजागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती व दंडात्मक मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसादसायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रमआयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी विविध विभागांचा घेतला आढावा

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आघाडीचे पाठबळ : डॉ. संजय डी. पाटील यांची ग्वाही; आघाडीच्यावतीने कुलगुरु, प्र-कुलगुरूंचे स्वागत

schedule09 Jun 26 person by visibility 113 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. आर. के. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांचे शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विकासात्मक उपक्रमांना आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आघाडीतर्फे सहकार्य व पाठबळ देऊ, अशी ग्वाही आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.

अध्यक्ष डॉ. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. कामत आणि डॉ. जाधव यांचे स्वागत केले. विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. यासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही डॉक्टर पाटील व पदाधिकाऱ्यांनी दिली. 

डॉ. कामत यांनी विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू. विद्यापीठाला नवी उंची मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली.

यावेळी पारंपरिक विद्यापीठांचे प्रश्न समस्या यावर चर्चा झाली. विद्यापीठाचे नाव भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक उंचावण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली.

यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, आघाडीचे उपाध्यक्ष भैय्या माने, डॉ. प्रताप पाटील, डॉ. डी. आर. मोरे, के. एस. चोगले,  कौस्तुभ गावडे, डॉ.  मेघा गुळवणी, डॉ. मंजिरी मोरे,  ॲड. अभिजित कापसे, डॉ. एस. एस. घाळी , डॉ. आर. वाय. पाटील, प्रा. अनिल कुराडे,   संजय जाधव, विनोद पंडित, डॉ. दत्ता पाटील, उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes